लॅटिन अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासोबतच 20 देशात प्रसिद्ध असणारी ‘राइड’ ही बाइक आता भारतात आली आहे. भारतीय ग्राहकांना हव्या असणा-या सर्वच सुविधा या बाइकमध्ये आहेत.
यामध्ये युसबी पोर्ट चार्जर देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने गाडी चालवताना तुम्ही मोबाइल चार्ज करू शकता. या बाइकमध्ये अॅक्टीव स्पॉट मिरर लावण्यात आले आहे. जे एखादी गाडी तुमच्या बाइकच्या जवळ आल्यावर तुम्हाला त्याची सुचना देते. याचे टायर स्मार्ट सीलेंट आहेत, जे पंक्चर झाल्यानंतर एका द्रव्याच्या मदतीने अपोआप सील होतात. याचबरोबर याचे स्मार्ट हेलमेट इंडिकेटर आणि ब्रेक लाइटला ब्ल्युटूथच्या साहाय्याने जोडले गलेले आहे. म्हणजे ब्रेक लावताना हेलमेटच्या मागच्या बाजूचा लाइट लागतो याचबरोबर एक बटन दाबून तुम्ही फोनही रिसिव्ह करू शकता.
या बाइकचे पेंटही स्मार्ट आहे जे रात्री चमकते. यात मोटार सायकल डिलीवरी ट्रेलरही लावण्यात आले आहे. जे लांब पल्ल्याचा प्रवास करताना अधिक वजन घेऊन जाण्यासाठी उपयोगी आहे. याची सिट युएम जेलने तयार करण्यात आले आहे जे डाइव्हरला एक्सट्रा कम्फर्ट देते.
हे सर्व फिचर असणारी यूएम (यूनाटेड मोटर्स) कंपनीची ही बाइक, 14 वर्षापूर्वी अमेरिकेच्या रस्त्यावरून चालणारी ही बाइकअनेक देशातसोबतच आता भारतात पोहचली आहे. ही कंपनी या वर्षाच्या शेवटी पर्यंत भारतीय बाजारपेठेत उतरणार असल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले. कंपनीने रेनगेड ड्युटी, रेनगेड कमांडो, एक्स ट्रिट आर या बाइक ऑटो एक्सपोमध्ये डिस्प्ले केल्या आहेत. 180 सीसी इंजिन असणा-या रेनगेड ड्युटी ची किंमत 75 हजार ते दीड लाखांपर्यंत असणार आहे.
हे सर्व फीचर्स तुम्ही तुमच्या बाइकमध्ये लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तसेही करू शकता पण यासाठी तुम्हाला ही कंपनी भारतीय बाजारपेठेत दाखल होईपर्यंत वाट पाहावी लागेल.
या बाइकचे खास फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...