आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto Expo: ऑटो कंपन्यांची मदार सोशल मीडियावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियाच्या प्रेमात रममाण झालेल्या यंगिस्तानला मोटार, बाइकच्या दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आता वाहन कंपन्यांनाही सोशल मीडिया नेटवर्कची कास धरणे भाग पडले आहे. यू ट्यूब, ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमातून तरुण ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये सुरू झालेली स्पर्धा हे यंदाच्या दिल्लीत भरलेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनाची खास बाब सांगता येईल.
आजकालची तरुण पिढी जास्त जागरूक असून त्यांना काय हवे आहे ते त्यांना नेमके कळते. त्यामुळे डिजिटल मंच ही या ग्राहकांना आकर्षित करण्याची एक अनोखी अशी संकल्पना ठरली आहे. ज्यामुळे ग्राहकांशी थेट संवाद साधला जातो आणि त्यांनाही आमच्या ब्रॅँडची नेमकी माहिती होण्यास मदत होते. ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या प्रवक्त्याने व्यक्त केलेली भावना आज वाहन उद्योगातील जवळपास प्रत्येक कंपनीची आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी विविध मार्गांचा अवलंब करून सोशल मीडियावर ‘अपडेट’ राहण्यासाठी धडपडत आहे. ऑटो एक्स्पोच्या फेसबुक पेजवरील 43 हजार फॅन्स हे त्याचेच एक द्योतक आहे.
शेव्हर्ले, मर्सिडीझ, हीरो, महिंद्रा, ऑडी : गुगलशी भागीदारी करून ‘यू ट्यूब’ आणि ‘गुगल + हॅँगआऊटस’च्या माध्यमातून मोटारींचे लॉँचिंग आणि प्रचाराचा अनोखा अनुभव
मर्सिडीझ बेंझ : गुगल हॅँगआऊट्स, गुगल ऑन डिमांडद्वारे अधिकृत यू ट्यूबर विविध वाहन कार्यक्रमांचा लाइव्ह रिपोर्ताज, स्टॉलचा व्हर्च्युअल टूर.
सुझुकी : ट्विटरवरून बेल (बझ) देऊन आपल्या उत्पादनांच्या आसपास आलेल्या लोकांचे लक्ष वेधणे. स्टॉलला भेट देणारे फोटो काढून फेसबुकवर टाकू शकतात किंवा ट्विट करू शकतात.
शेव्हर्ले : चॅटेराटी या अनोख्या संवादात्मक मंचावरून ग्राहकांशी संपर्क
हीरो : प्रत्येक अंशांतून एक्स्पोचा ऑनलाइन आनंद लुटण्यासाठी ‘स्विच’ सुविधा. रणबीर कपूरबरोबर ‘गुगल +’ वर
हॅँगआऊट’ चर्चा
सोशल मीडियामध्ये होंडा टॉप
ट्विटर, फोरम, ब्लॉग्ज तसेच मुख्य प्रसार माध्यमांकडून संकलित केलेल्या माहितीनुसार वाहनांशी निगडित माहितीसाठी खरेदीदार हा टीव्ही किंवा प्रिंट माध्यमांपेक्षा इंटरनेटला जास्त महत्त्व देत आहे. इंटरनेटचे 200 दशलक्षांपेक्षा जास्त वापरकर्ते वाहन खरेदीबाबतचा निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे वाहन कंपन्या डिजिटल माध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी जास्त आक्रमक झाल्या आहेत.
गौरव कपूर, प्रमुख गुगल इंडिया