Home | Business | Auto | auto hub, gujrat, business, national

गुजरात बनणार ऑटोमोबाइल हब

agency | Update - Jun 06, 2011, 12:49 PM IST

नॅनो कारच्या प्रकल्पानंतर गुजरातेत आता मारुती आणि फ्रान्सच्या पिगॉट सिट्रॉनचे प्रकल्प

  • auto hub, gujrat, business, national

    nano_146सर्वसामान्यांची कार म्हणून ओळखली जाणार्‍या नॅनो कारच्या प्रकल्पानंतर गुजरातेत आता मारुती आणि फ्रान्सच्या पिगॉट सिट्रॉनचे प्रकल्प आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. गुजरातच्या अर्थचक्रास आता गती येईल.

    पश्चिम बंगालमध्ये टाटाच्या नॅनो प्रकल्पास विरोध झाल्यानंतर मोदीनी रतन टाटांना तेथे येण्याचे निमंत्रण दिले. महाराष्ट्रही पायघड्या घालण्यास तयार होता, पण गुजरातमध्ये असलेला कुशल कर्मचारीवर्ग आणि उद्योगासाठी गुजरात शासनाचे लवचिक धोरण यामुळे हा प्रकल्प टाटांनी तेथे नेला. वर्षभरापूर्वी नॅनोच्या उत्पादनास सुरुवातही झाली.आता मारुती सुझुकी आणि फ्रान्सच्या पिगॉट सिट्रानचे उत्पादन तेथेच सुरू होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तेथे औद्योगिक विकास सातत्याने होत असून, प्रकल्पासाठी त्वरित जागा उपलब्ध करून देण्याची तयारी, अखंड विद्युत पुरवठा आणि राज्यभरात पसरलेले उत्तम रस्त्यांचे जाळे या सुविधांमुळे गुजरात आता ऑटोमोबाईल हब बनणार आहे. तामिळनाडूतील चेन्नई, महाराष्ट्रातील पुणे आणि पंजाबमधील गुरगाव या शहरातील ऑटोमोबाईल क्षेत्राच्या वर्चस्वाला गुजरात शासनाने आव्हान उभे केले असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.Trending