आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto : नववर्षाच्या स्वागताला नवी जॅझ..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होंडाची जॅझ कार मिड सेगमेंटमध्ये खूप प्रभावी आहे. डिझेल इंजिन आणि किमतीमुळे ही कार मारुती स्विफ्टशी स्पर्धा करू शकते. 2009 मध्ये जॅझ लाँच झाली तेव्हा या हॅचबॅक कारची भरपूर चर्चा झाली होती. कार उत्कृष्ट असून फक्त जास्त किंमत असल्यामुळे बाजारात टिकली नाही. नंतर किंमत कमी झाली, पण काही उपयोग नाही झाला. कारचे पेट्रोल व्हर्जन ही आणखी एक समस्या होती. अखेर होंडाला या कारची निर्मिती या वर्षाच्या सुरुवातीलाच बंद करावे लागले.
नव्या जॅझमध्ये डिझेल इंजिन
आता होंडाने नव्या जॅझमध्ये अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. नव्या जॅझमध्ये 1.5 लिटर आय-डिटेक इंजिन असेल. अमेझ कारमध्ये हे इंजिन आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजिनदेखील असेल.
किंमतही अशी कमी करणार
किमतीच्या स्पर्धेत जॅझ टिकण्यासाठी होंडा कंपनी राजस्थानमधील टापुकारा संयंत्रात या कारची निर्मिती करणार आहे. यात स्थानिक मदत अधिक मिळणार आहे. नवी जॅझ आणि नव्या सिटीचा प्लॅटफॉर्म एकच असल्यामुळे कारचा खर्चही कमी होऊ शकतो.
आतील बाजू अधिक दर्जेदार
कारच्या आतील केबिनचे लेआउट नेहमीचेच वाटेल, मात्र त्यात इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नवे आहे. फ्रंट सीट आरामदायी आहे. कंपनीने इंटेरिअरच्या दर्जाबाबतीत थोडी तडजोड केली आहे. कारण कंपनीला किमतीच्या बाबतीतही कार स्पर्धेत टिकवून ठेवायची आहे. जुन्या जॅझसारखेच नव्या कारमध्ये मागील सीटवरही ऐसपैस जागा आहे. यात सहा फुटांची व्यक्त सहजपणे बसू शकते. एकूणच नवी जॅझ ही एक दर्जेदार हॅचबॅक आहे.
नव्या जॅझचे देखणे रूप
नव्या जॅझचा लूक जुन्या जॅझसारखाच म्हणजेच क्लासी-एमपीव्ही हॅचसारका असेल. कारच्या ग्रिल आणखी चमकदार आणि स्पोर्टियर ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जुन्या कारपेक्षा ती अधिक आक्रमक दिसेल. बंपरवरील मोठ्या एअरव्हेंट्समुळे कार डायनॅमिक आणि आकर्षक दिसेल.
प्रोफाइल असे असेल
प्रोफाइलनुसार नव्या आणि जुन्या जॅझमध्ये खूप फरक असेल. होंडाचे ‘एच’ हे डिझाइन लँग्वेज कारच्या प्रोफाइलला शक्ती प्रदान करते. सर्वात मोठा फरक म्हणजे, नव्या जॅझमध्ये मागील टेल लँपपासून फ्रंट डोअरपर्यंत मोठी कॅरेक्टर लाइन ठेवण्यात आली आहे.
किंमत : 6लाखांपासून सुरू
व्हीलबेस
2530 मिमी
इंजिन : 4 सिलिंडर इन-लाइन, 1496 सीसी, पेट्रोल, इलेक्ट्रिक मोटर
पॉवर : 108 बीएचपी (पेट्रोल)
29.5 बीएचपी (इलेक्ट्रिक)
गिअरबॉक्स : सेव्हन-स्पीड ड्युएल क्लच ऑटो