आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto: New Models Arrive In Auto Expo, Tricks Of Company To Increase Sell

Auto: नोएडातील ऑटो एक्स्पोमध्ये नव्या मॉडेल्सची धूम, विक्री वाढवण्‍यासाठी कंपन्यांची नवी योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युंदाइने नवीन सँटा एफई कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली. त्या वेळी कंपनीचे एमडी बी. एस. सिओ. - Divya Marathi
ह्युंदाइने नवीन सँटा एफई कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली. त्या वेळी कंपनीचे एमडी बी. एस. सिओ.
ग्रेटर नोएडा - देशात वाहन विक्रीच्या रस्त्यावर दिग्गज कंपन्यांना फटका बसत असताना ग्रेटर नोयडात बुधवारपासून सुरू झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपन्यांनी नव्या मॉडेलचा धडाका लावला आहे. विक्रीचा घाट पार करण्यासाठी ही नवी मॉडेल्स साथ देतील, अशी आशा वाहन निर्मिती कंपन्यांना आहे.
चार नव्या मॉडेल्सची घोषणा
देशातील मोटारसायकल विक्रीतील हिस्सा दुप्पट करण्याच्या दृष्टीने सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या जपानी कंपनीने जोरदार तयारी केली आहे. कंपनीने बुधवारी व्ही स्ट्रॉम 1000 ही 15 लाख रुपये किमतीची बाइक तसेच लेटस नावाची स्कूटर सादर केली. कंपनीने 250 सीसीची इनाझुमा आणि 155 सीसीची गिएक्स्सर या आणखी दोन बाइक सादर केल्या. कंपनीची स्कूटर एप्रिलमध्ये तर गिएक्सर जुलै किंवा ऑगस्टमध्ये बाजारात येण्याची शक्यता सुझुकी मोटर कॉर्पोरेशन इंडियाचे उपाध्यक्ष अतुल गुप्ता यांनी व्यक्त केली. स्कूटर आणि गिएक्सरची किंमत मात्र त्यांनी जाहीर केली नाही. आफ्रिका, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशात निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे. सध्या भारतीय स्कूटर बाजारात कंपनीचा 12 टक्के हिस्सा आहे.
यामाहाची नवी स्कूटर
यामाहाने बुधवारी नवीन स्कूटर सादर केली. देशात सहा लाख स्कूटर विक्रीचे उद्दिष्ट असल्याचे यामाहाने स्पष्ट केले. नव्या स्कूटरची किंमत 49,518 रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे. अल्फा नावाची ही स्कूटर फोर स्ट्रोक, 113 सीसीची असून लिटरमागे 62 किलोमीटर मायलेज देईल, असा दावा यामाहा कंपनीने केला आहे. यामाहाचे अध्यक्ष व सीईओ हिरोयुकी यानागी यांनी सांगितले, गेल्या वर्षभरात कंपनीने देशात 4.5 लाख मोटारसायकलींची विक्री केली. यंदा सहा लाख बाइक विक्री करण्याची कंपनीची योजना आहे.
हीरोच्या 110 सीसी मोटारसायकल्स
देशातील सर्वात मोठ्या मोटारसायकल निर्मिती करणा-या हीरो मोटोकॉर्पने ऑटो एक्स्पोमध्ये 110 सीसीच्या दोन नव्या मोटारसायकली सादर केल्या. स्प्लेंडर प्रो क्लासिक आणि पॅशन टीआर अशी या बाइकची नावे आहेत. याशिवाय कंपनीने 620 सीसीची सुपर प्रीमियम मोटारबाइक हस्तूर आणि सिंप्लिसिटी व आयऑन या दोन कन्सेप्ट बाइक सादर केल्या. कंपनीचे सीईओ पवन मुंजाल यांनी सांगितले, स्प्लेंडर आणि पॅशनच्या नव्या आवृत्त्या बाजारात येण्यासाठी तयार आहेत. हस्तूर बाजारात दाखल करण्यापूर्वी त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे. यंदाच्या दुस-या सहामाहीत चांगल्या वाढीची शक्यता त्यांनी वर्तवली.