आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडा अमेझ, ब्रियोचे रिकॉल ; 31,226 कारमध्ये सदोष ब्रेकिंगची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयल) अमेज कॉम्पॅक्ट सेडान व ब्रियो हॅचबॅक मॉडेल्सच्या 31,266 कार परत बोलावणार आहे. या मॉडेल्सच्या ब्रेकिंग यंत्रणेत दोष आढळण्याची शक्यता असल्याने होंडाने हे रिकॉल केले आहे.
कंपनी 28 फेब्रुवारी 2013 ते 16 जानेवारी 2014 दरम्यान तयार झालेल्या या मॉडेल्सच्या (एअरबॅग्ज सुविधा नसलेल्या) प्रपोर्शनिंग व्हॉल्व्हची तपासणी करणार आहे. यानुसार 15,623 ब्रियो आणि 15,603 पेट्रोल अमेझ कार परत बोलावून त्यांची तपासणी केली जाईल, असे एचसीआयएलने म्हटले आहे.
काय आहे प्रपोर्शनिंग व्हॉल्व्ह
कारच्या चाकांवर ब्रेकच्या प्रेशरची समप्रमाणात विभागणी करणार्‍या यंत्रणेला साधारणपणे प्रपोर्शनिंग व्हॉल्व्ह असे संबोधले जाते.
तपासणी, दुरुस्ती मोफत
कारच्या ब्रेकिंगमध्ये दोष आढळल्यास डीलर्सकडे त्याची मोफत तपासणी व दुरुस्ती करून दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कारमालकांशी संपर्क साधून दुरुस्ती केली जाईल.
व्हीएआयएन महत्त्वाचा
० या मॉडेल्सचे मालक कंपनीच्या वेबसाइटवर आपला 17 अंकी व्हेइकल आयडेंटिफिकेशन नंबर (व्हीआयएन) दाखल करून माहिती घेऊ शकतील.
० कंपनीनुसार काही कारमध्ये प्रपोर्शनिंग व्हॉल्व्ह योग्यरीत्या बसला नसल्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत एकही तक्रार मिळालेली नाही.