आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto: निस्सानची आली डॅटसन गो हॅचबॅक कार, 4 लाखांत देणार 20 किलोमीटर मायलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - वाहन निर्मिती क्षेत्रातील जपानची आघाडीची कंपनी निस्सानने मंगळवारी डॅटसन गो ही हॅचबॅक कार सादर केली. सध्या ही कार असेम्ब्ली लाइनवरून सादर करण्यात आली असून काही दिवसांनी ती कारप्रेमींना खरेदीसाठी उपलब्ध होईल. याची किंमत चार लाख रुपयांहून कमी असल्याची चर्चा असून एक लिटरमध्ये ही कार 20 किलोमीटर अंतर कापेल, असा दावा करण्यात येत आहे.
जे ग्राहक प्रथमच कार खरेदी करत आहेत त्यांच्यासाठी डॅटसन गो सादर करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत शेव्हरले स्पार्क, मारुती ए-स्टार आणि ह्युंदाई-10 यांसारख्या कारबरोबर डॅटसन गोला स्पर्धा करावी लागणार आहे. बुधवारपासून सुरू होणार्‍या ऑटो एक्स्पोमध्ये डॅटसन गो ठेवण्यात येणार आहे. यामुळे बारतीय बाजारात कार मध्ये स्पर्धा रंगणार असून वाजवी किमतीत चांगल्या सुविधा असणार्‍या कार सादर होत असल्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.
जपानचे उद्योगमंत्री पी. थंगमनी यांनी कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत डॅटसन गो सादर केली. निस्सानचे उपाध्यक्ष तोशियुगी शिगा, कॉर्पोरेट विभागाचे अध्यक्ष डॅटसन विन्सेंट कोबी आणि जपानचे कौन्सिल जनरल मासानारी नाकानो यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. शिगा यांनी सांगितले, निस्सानसाठी हा ऐतिहासिक दिवस असून ही एक सुरुवात आहे. मार्चमध्ये डॅटसन गोच्या प्रत्यक्ष विक्रीस सुरुवात होईल. त्यानंतर त्याची र्शेणी वाढवण्याची कंपनीची योजना आहे. कोबी यांच्या मते, भारतात निस्सान मोटार कॉर्पोरेशनच्या विक्रीत डॅटसन कारच्या विक्रीचा वाटा 50 टक्क्यांहून जास्त राहील. चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर डॅटसन गो बाजारात येणार आहे. नवी दिल्लीत भरणार्‍या ऑटो एक्स्पोमध्ये डॅटसन गो कार विविध रंगांच्या मॉडेलसह ठेवण्यात येणार आहे. याच प्रदर्शनात डॅटसनची कन्सेप्ट कारही ठेवण्यात येणार आहे.