आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Auto: रेनो कॉलिओ एसयूव्हीचे नवे फेसलिफ्ट मॉडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हणजे युरोपीय डिझाइन आणि शानदार राइड क्वालिटीसह शक्तिशाली, प्रॅक्टिकल आणि अधिक चांगल्या प्रकारे तयार केलेली एसयूव्ही आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कारण किंमत अधिक आहे. तसेच याच सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड अँडेव्हर, ह्युंदाई सँटा फे, शेव्हरले कॅप्टिव्हा आणि स्कोडा येतीसारख्या कार आधीपासूनच आहेत. त्यामुळे ग्राहकांनी या बँडची कार घेण्याचा धोका पत्करला नाही. कोलिओची इमेज हेही त्यामागचे एक कारण आहे. मोठ्या आणि रफटफ एसयूव्हींना पसंती मिळणा-या भारतासारख्या बाजारपेठेत रेनोची नाजूक, क्रॉसओव्हर स्टायलिंग असणा-या कोलिओची जादू चालणे शक्य नाही. डस्टरच्या यशामुळे उत्साह वाढलेली रेनो आता कोलिओचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करत आहे.
स्टँडर्ड इक्विपमेंट कायम
नवीन मॉडेलमध्ये स्टँडर्ड इक्विपमेंट आहेत. फेसलिफ्टमध्येही ते कायम आहेत. मागच्या सीटच्या आर्मरेस्टमध्ये एक जोडी कप होल्डर्स आणि ड्रायव्हर विंडोच्या वर एक सनग्लास होल्डरही देण्यात आले आहे. त्याशिवाय बोस अ‍ॅट स्पीकर ऑडिओ सिस्टिम देण्यात आली आहे. त्यात सीडी, एयूएक्स, यूएसबी आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे.
इंजिन अधिक शक्तिशाली
जुन्या कोलिओमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 4७4 चे एकच इंजिन होते. नव्या कारमध्ये 4७4 मॅन्युअल आणि 4७2 मॅन्युअल ऑप्शनही आहे. हे सर्व 2.0 लिटर डिझेल इंजिनमध्ये आहे; पण 4७2 मध्ये आधीच्या प्रमाणे 148 बीएचपी आणि 32.6 किलोग्रॅम टॉर्क पॉवर मिळेल. 4 ७4 मध्ये 171 बीएचपी आणि 36.7 टॉर्क पॉवर आहे. त्यामुळे नवे व्हर्जन शक्तिशाली आहे. दोन हजार आरपीएमनंतरही टर्बो जाणवत नाही.
इंटेरिअरमध्ये बदल नाही
कारच्या इंटेरिअरमध्ये फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. याची टू टोन केबिन जशास तशीच आहे. महागडी कार असूनही प्लास्टिकला फारसा दर्जा नाही. कारमध्ये लावण्यात आलेले काही बटण आणि स्विच स्वस्तातील असल्यासारखे दिसतात; पण लेदर सीट्सचा दर्जा मात्र उत्तम आहे. लाँग ड्राइव्हसाठी फ्रंट चेअर्स आरामदायी आहेत. समोरच्या प्रवाशालाही इलेक्ट्रिक अ‍ॅडस्टमेंट करता येऊ शकते. सीट बॅक थाय सपोर्ट चांगला आहे. तीन लोक आरामात बसू शकतात.
वैशिष्ट्ये
* हायवे क्रूझर
*अतिशय आरामदायी
उणिवा
* टर्बो लेग
* अधिक किंमत
किंमत
25 ते 30 लाख (अंदाजित)