आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाईच्या फे-यातून वाचल्या सेडान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकलवरील (एसयूव्ही) उत्पादन शुल्कात तीन टक्के वाढ करण्यात आली होती. ही शुल्कवाढ मागे घेण्याचा सरकारचा इरादा नाही. वाढीव उत्पादन शुल्काच्या व्याख्येनुसार सर्व सेडान कार या वाढीतून मुक्त झाल्या आहेत.

चार मीटर किंवा त्याहून अधिक लांबीच्या एसयूव्ही कारवर आता 30 टक्के उत्पादन शुल्क द्यावे लागत आहे. तसेच जमिनीपासून 170 एमएम उंची (ग्राउंड क्लिअरन्स) असणा-या सर्व एसयूव्ही शुल्कवाढीच्या कचाट्यात आल्या आहेत. क्वांटो वगळता महिंद्राची सर्व वाहने या शुल्कवाढीच्या कक्षेत आली आहेत. तर
नव्या व्याख्येमुळे दोन बॉक्सच्या सोडान कार महागाईच्या फे-या तून वाचल्या आहेत.

दोन बॉक्स असणा-या वाहनांवरच लागणार शुल्क - दोन बॉक्स असणा-या प्रवासी वाहनांवरच वाढीव उत्पादन शुल्क लागू होईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. यामुळे अनेक सेडान कारना दिलासा मिळाला. या सेडान कारना पूर्वीप्रमाणेच 27 टक्के उत्पादन शुल्क द्यावे लागेल. केंद्रीय अर्थसंकल्पात एसयूव्हीवरील उत्पादन शुल्कात 3 टक्के वाढ करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय आहे.

बाजारात उपलब्ध असणा-या बहुतेक सेडान कार तीन बॉक्सच्या आहेत, तर सर्व हॅचबॅक आणि एसयूव्हीसह सर्व युटिलिटी वाहनांची गणना त्याच्या वेगळ्या रचनेमुळे दोन बॉक्सच्या वाहनांत होते. सर्व एसयूव्ही 15 ते 35 हजारांनी महागल्या- केंद्रीय अर्थसंकल्पात एसयूव्हीवरील उत्पादन शुल्कात तीन टक्के वाढ करण्यात आल्याने सर्व एसयूव्हींच्या किमती 15 ते 35 हजारांनी वधारल्या आहेत. आॅटोमोबाइल्स कंपन्यांनी सध्या या शुल्कवाढीला विरोध दर्शवला आहे. नव्या वाहनांच्या विक्रीत फेब्रुवारीमध्ये 26 टक्के घट झाली आहे. गेल्या 12 वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. अशा परिस्थितीत ही शुल्कवाढ सरकारला शोभत नसल्याचे मत या कंपन्यांनी व्यक्त केले.

दोन आणि तीन बॉक्सचे वाहन म्हणजे काय? - मारुती अल्टोमध्ये पुढे बॉनेट आणि मागे बसण्यासाठी आसने असतात. अशा प्रकारच्या वाहनांचे वर्गीकरण दोन बॉक्स वाहन प्रकारात होते. एसएक्स4 मध्ये बॉनेट आणि आसनासह मागे डिकीही असते. त्यामुळे अशी वाहने तीन बॉक्स वाहन प्रकारात येतात. सिव्हिक आणि अल्टिस अशा प्रकारात येतात.