आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाईकची पहिली सर्व्हिसिंग किती महत्वाची आहे ?
इंजिनच्या दीर्घ आयुष्यासाठी पहिली सर्व्हिसिंग वेळेवर होणे खूप महत्वाचे आहे. नव्या बाईकवर सुरूवातीला इंजिनबरोबर त्याच्या इतर पार्ट्सवरदेखील जास्त दबाव पडत असतो. त्यामुळे जवळपास सर्वच बाईक उत्पादक कंपन्या 500 किलोमीटर नंतर पहिली सर्व्हिसिंग करण्याचा सल्ला देतात. यावेळी सर्व्हिस स्टेशनवर बाईकचे टेस्टिंग आणि सर्व्हिसिंग केले जाते.
नव्या बाईकवर दूरच्या प्रवासाला जाता येईल काय ?
- बाईक आपली आहे. त्यामुळे ती कुठेही घेऊन जाता येते. पण नव्या बाईकवर जास्त दबाव टाकणे योग्य नाही. विशेषत: ओव्हर स्पीड आणि ओव्हर लोडिंगवर खास लक्ष दिले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लॉंग ड्राईव्हवर जाण्यापूर्वी पहिल्या सर्व्हिसिंगकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर दुस-या शहरात जाणार असाल तर त्या शहरातील कंपनीच्या सर्व्हिस स्टेशनची माहिती घेणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.