आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auto World: Swift And Datson Go Failed In Crash Test

ऑटो विश्‍व: स्विफ्ट आणि डॅटसन गो क्रॅश टेस्टमध्ये नापास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मारुती सुझुकीची लोकप्रिय कार स्विफ्ट आणि निस्सानची डॅटसन गो क्रॅश टेस्टमध्ये नापास झाल्या आहेत. स्विफ्ट ही प्रीमियम हॅचबॅक तर डॅटसन गो एंट्री लेव्हल कार आहे, समोरासमोरच्या धडकेच्या चाचणीत (६४ किमी/ताशी) दोन्ही कारना पाचपैकी एकही स्टार मिळाला नाही. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या कारच्या डमींचे जिवावर बेतणारे नुकसान झाले. स्विफ्टच्या भारतात विक्री होणा-या आणि लॅटिन अमेरिकेला निर्यात होणा-या मॉडेलची चाचणी झाली. लॅटिन अमेरिकेत बेस मॉडेलमध्येही एअर बॅग्ज असतात, भारतात मात्र नसतात.

२०१७ पासून चाचणी अनिवार्य : देशात ऑक्टोबर २०१७ पासून सर्व कारसाठी क्रॅश टेस्ट अनिवार्य होणार असल्याचे परिवहन मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर यांनी सांगितले.

मारुती स्विफ्ट : प्रौढांच्या सुरक्षेला शून्य स्टार, मुलांच्या सुरक्षेला एक स्टार. कमकुवत बॉडी. एअरबॅग्ज बसवल्यास उत्तम होणे शक्य.

पुढे वाचा निस्सान डॅटसन गो....