आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Automobile: 40 To 45 Lacks Prices Three Luxsary Cars

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटोमोबाइल: 40 ते 45 लाख किमतीच्या तीन लक्झरी सलून कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार सिलिंडर असणा-या या तीन लक्झरी सलून कार आरामदायी प्रवासाचा एक निराळाच अनुभव देतात. कार चालवण्याचा विचार सोडून दिला तरी मागे बसण्याचा अनुभव तितकाच लक्झरिअस ठरतो. सुमारे वर्षभराच्या उशिरानंतर बीएमडब्ल्यूने नवीन 5 - सीरिजची कार बाजारात आणली आहे. त्यानंतर ऑडीने ए 6 बाजारात आणली. गेल्या वर्षी जग्वारने एक्सएफ बाजरात आणली. भारताच्या परिस्थितीतील फरक म्हणजे येथे या कार ड्रायव्हर चालवतात, तर कारच्या किमतींवर सर्व परिस्थिती अवलंबून असते. सरासरी पाहिली तर ऑडी ए 62.0, टीडीआय, बीएमडब्ल्यू 520 ऑडी आणि जग्वार एक्सएफ 2.2 च्या किमती फार वाटत नाहीत. या प्रत्येक कारचे स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य आहे. एक कार चालवण्याचा अनुभव अत्यंत रोमांचक असतो, तर दुसरी फुल राईडचा अत्युच्च आनंद देते. तर तिसरी इतकी आरामदायी आहे की, हा प्रवास सुरूच राहावा असे वाटत राहते... तिन्ही कारवर एक नजर.
जग्वार एक्सएफ 2.2डी
जग्वारने नुकतेच एक्सएफ कारमध्ये काही बदल केले आहेत. कारच्या 2.2 डिझेल इंजिनमुळे विक्रीमध्ये 68 टक्के वाढ झाली आहे. किंमत प्रतिस्पर्धी 6 सिलिंडर कारहूनही 10 लाखांनी कमी आहे. कारमध्ये ट्रॅडिशनल बिग-सलून ले-आऊट आहे. यात 8 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आहे. गाडीचा डॅशबोर्ड खालच्या बाजूस आहे. त्यामुळे रस्ता दिसण्यास फारशी अडचण होत नाही; पण त्याचे डिझाइन खूपच जुने आहे. अल्ट्रा मॉडर्नसारखे यात एकही फीचर नाही. सीटची कुशन क्वालिटीही उत्कृष्ट आहे. हेडरूम खालच्या बाजूस आहे. तसेच खिडकीचा आकारही खूपच लहान आहे.
ऑडी ए6 2.0 टीडीआय
कारच्या डॅशबोर्डला अल्ट्रा मॉडर्न लूक देण्यात आला आहे. ही तांत्रिक बाजू म्हणता येऊ शकते. मात्र, कारच्या इंटेरिअरमध्ये चूक शोधणे खूपच अवघड आहे. लाइट बिल्डकडे मात्र लक्ष देण्यात आलेले नाही. दुस-या गाड्यांच्या तुलनेत थाय सपोर्टही खूपच कमी आहे. वेग कितीही असला तरी गाडीचा आवाजही ऐकू येत नाही. तिन्ही कारमध्ये ही एकमेव अशी कार आहे, ज्यामध्ये फोर-झोन क्लायमेट कंट्रोल फीचर देण्यात आले आहे. स्टिअरिंग अ‍ॅडजस्ट मॅन्युअल आहे. यात ऑटो स्टार्ट-स्टॉप बटन, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, पॅडल शिफ्टरसह सनरूफही आहे. अपघातात होणारी हानी टाळण्यासाठी 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

नवी होंडा जॅझ 2014 मध्‍ये
कारची बांधणी उत्कृष्ट आहे. त्यामुळे गाडी चालण्याचा अनुभव अधिक चांगला बनतो. स्टेअरिंग अ‍ॅडजस्ट इलेक्ट्रिक आहे. यात ऑटो स्टार्ट स्टॉप, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ड्युएल झोन क्लायमेट कंट्रोल आणि सनरूफ आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत. यात 8 स्पीड ऑटो गिअरबॉक्स आहे. त्याला स्मूथ शिफ्ट आणि क्वीक रिस्पॉन्स आहे. 70 लिटरचे फ्युएल टँक, पुढचे ब्रेक व्हेंटिलेटेड डिस्क आणि मागचे सॉलिड डिस्क आहे. चौथ्या गिअरवर केवळ 6.71 सेकंदांत गाडी ताशी 40-100 किमीचा वेग पकडते. डॅशबोर्डवर लावण्यात आलेल्या स्क्रीनचा आकार खूपच छोटा आहे.