आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाइल: सणाची कार महागणार फार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत मागील महिन्यात झालेल्या रुपयाच्या घसरणीने आता ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. मारुतीपाठोपाठ महिंद्रानेही सर्व वाहनांच्या किमती एक ऑक्टोबरपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुचाकी निर्माती बजाज ऑटो कंपनीनेही मोटारसायकलीच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यंदाच्या दसरा-दिवाळीत महागडी वाहने खरेदी करावी लागणार आहेत.

किंमतवाढीबाबत महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आणि रुपया घसरल्याने सर्व प्रवासी तसेच व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. यामुळे मॉडेलनिहाय 6000 ते 20,000 रुपयांनी किमती वाढणार आहेत. नव्या किमती एक ऑक्टोबरपासून लागू होतील. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी प्रवीण शाह म्हणाले, किंमतवाढीबाबत कंपनीने बराच संयम राखला. मात्र, आता हा ताण सहन करणे आवाक्याबाहेरचे आहे. महागडा कच्चा माल आणि घसरलेला रुपया यामुळे किमतीत वाढ करणे अपरिहार्य आहे.

बजाजकडून संकेत
सुट्या भागांच्या किमती वाढल्यामुळे सर्व मोटारसायकलींच्या किमती वाढवण्याबाबत बजाज ऑटोचा विचार असल्याचे कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी सांगितले. कोणत्या मोटारसायकलची किंमत कितीने आणि केव्हा वाढवायची याबाबत विचार सुरू असल्याचे बजाज यांनी स्पष्ट केले. बजाजने सहा महिन्यांपूर्वी वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या. त्या वेळी डॉलरच्या तुलनेत रुपया 53 ते 54 या पातळीत होता. आता रुपयाने साठी ओलांडली आहे. त्यामुळे किंमतवाढीचा मोठा दबाव जाणवतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा किमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे बजाज म्हणाले.


आतापर्यंत महागलेल्या कार
मारुती 10 हजारांपर्यंत एक ऑक्टो.पासून
ह्युंदाई 20 हजारांपर्यंत सणांचा हंगाम
जनरल मोटर्स 10 हजारांपर्यंत सप्टेंबरपासून
टाटा मोटर्स एक ते 1.5 } निश्चित नाही
टोयोटा 24 हजारांपर्यंत 21 सप्टेंबरपासून
र्मसिडीझ-बेंझ 4.5 टक्के ऑगस्टपासून
ऑडी चार टक्के जुलैपासून