आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile Industry: Ford India Purchasing Increased By 14 Percent

वाहन उद्योग: फोर्ड इंडियाच्या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फोर्ड इंडियाने आपल्या ग्लोबल वन फोर्ड वाहनांच्या ताफ्यात फोर्ड इकोस्पोर्ट दाखल केल्यानंतर एकत्रित घाऊक विक्री आणि निर्यातीतून 8,771 वाहनांची विक्री केली आहे. ‘इकोस्पोर्ट’च्या मदतीने कंपनीने स्थानिक बाजारपेठेत 7,145 वाहनांची विक्री केली आहे. वार्षिक आधारावर या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


वाहन बाजारातील नकारात्मक वातावरण आणि चढ्या व्याजदरामुळे ग्राहकांच्या मागणीवर नकारात्मक परिणाम होऊनदेखील फोर्डने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी जूनमध्ये स्थानिक पातळीवर 6,267 वाहनांची विक्री केली होती. भारतीय बनावटीच्या वाहनांची मागणी परदेशात वाढल्यामुळे कंपनीची जूनमधील निर्यात 59 टक्क्यांनी वाढून ती 1,626 वाहनांवर गेली आहे.