आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो उद्योगातील मंदीने दीड लाखावर बेरोजगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मरगळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे वाहन उद्योगातील विशेष म्हणजे वाहन विक्रीला बसत असलेला फटका अद्यापही कायम आहे. वाहनांची विक्री 2013-14 मध्ये सलग दुसर्‍या वर्षात 4.65 टक्क्यांनी घटली आहे. परिणामी संपूर्ण वाहन उद्योगाला अंदाजे दीड लाख नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत.

देशातील मोटारींची विक्री 2012-13 मध्ये 6.69 टक्क्यांनी घटली होती. गेल्या दशकभरात पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण वाहन उद्योगाने अनुभवली होती. अर्थव्यवस्थेची मंदावलेली वाढ, चढे व्याजदर, इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि ग्राहकांची कमी झालेली मानसिकता यामुळे मागील वर्ष वाहन उद्योगासाठी अतिशय कठीण गेल्याचे मत ‘सियाम’चे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.

वाहन विक्रीतील घसरणीचा मोठा धक्का वाहन उद्योगाला बसत असून त्यामुळे कंत्राटी आणि हंगामी कामगारांच्या नोकर्‍यांवर कुºहाड आली असल्याबद्दल किर्लोस्कर यांनी चिंता व्यक्त केली.

विक्रीच्या घसरणीमुळे नोकर्‍यांवर किती परिणाम झाला याची आकडेवारी काढलेली नसली तरी वाहन उद्योगातील कच्च्या मालापासून ते वितरण केंद्रांपर्यंत प्रत्येक घटकाला याची झळ बसली असल्याचे असे मला व्यक्तिश: वाटते. त्यामुळे वाहन उद्योगाला अंदाजे एक ते दीड लाख नोकर्‍या गमवाव्या लागल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.