आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile Industry News In Marathi, Automatic Transmission, Divya Marathi

ऑटोमॅटिक ट्रान्समिशनकडे कार कंपन्यांचा वाढता कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची रुजूवात दशकभरापूर्र्वीच झाली. त्याची लोकप्रियता मात्र यथातथाच राहिल्याने त्याकडे ग्राहक फारसा वळला नाही. बड्या ब्रँड्सनी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या कार बाजारात उतरवल्या. मात्र त्याची विक्र ी केवळ एकूणात 5 टक्केच राहिली. या स्थितीत बदल होण्याच्या शक्यता आता निर्माण झाल्या आहेत. दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पोत मारुती सेलेरियो ही ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) बॉक्स असलेली कार लाँच करण्यात आली.


अन्य बड्या कार कंपन्यांनी दशकभरापूर्वीची एएमटी टेक्नॉलॉजी स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. अचानक या तंत्राकडे कंपन्या का वळल्या ? याचे मुख्य कारण म्हणजे चारचाकी गाड्यांची वाढती मागणी. दुसरे म्हणजे पेट्रोल व डिझेलच्या खर्चात बचत करणे. सेलेरियो इंजिन ड्राइव्ह त्याच्या मॅन्युअल व्हर्जनच्या तुलनेत फ क्त 39 हजारांनी महाग आहे. होंडाचे सर्वात स्वस्त मॅन्युअल मॉडेल ब्रायोची (एक्स शो रूम) किंमत 4.18 लाख आहे. यात ऑटोमॅटिक बॉक्स व्हर्जनची किंमत 6.19 लाख रुपये आहे. याचा अर्थ एएमटी बॉक्सची 2 लाख अतिरिक्त ग्राहकांना मोजावी लागेल. हा फरक फार मोठा आहे. मारुतीचा दावा आहे की, सेलेरियोची एएमटी कार मॅन्युअलच्या तुलनेत जास्त इंधन वाचवते. कार कंपन्या सर्व मॉडेल्समध्ये एएमटीचा विकल्प देतील याचीही दाट शक्यता आहे.


यातील उणिवा
एएमटीत एकमात्र उणीव म्हणजे यात रेग्युलर ऑटोमॅटिक्सचा स्मुथनेस व रिफाइनमेंटचा अभाव आहे. याच प्रमुख कारणामुळे विदेशात याचा वापर कमी आहे.