आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile : Maruti Brings Non Clucht Modern Car

Automobile: मारुती आणणार बिना क्लचची आधुनिक कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मागील 11 वर्षांमध्ये 2013 हे वर्ष कार विक्रीसाठी सर्वात संथ गणले गेले. मात्र, कार कंपन्यांनी अजूनही आशा सोडल्या नाहीत. 20 दिवसांनी दिल्लीत सुरू होणा-या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती कंपनी क्लचरहित कार तंत्रज्ञान सादर करणार आहे, तर चार कार कंपन्या स्वस्त एसयूव्ही बाजारात उतरवणार आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांनी शोरूमला भेट द्यावी, हीच कंपन्यांची अपेक्षा आहे. 20 नव्या आणि 12 फेसलिफ्ट कार पाहण्यासाठी जगभराचे लक्ष या ऑटो एक्स्पोकडे लागले आहे.
चार नव्या लहान एसयूव्ही येणार : डस्टर व इकोस्पोर्ट्सला आव्हान
मारुती सुझुकी यॅड (एक्सए अल्फा)
एसएक्स-फोरच्या धर्तीवर मारुती कंपनी यॅड कार बाजारात उतरवत आहे. वर्षअखेरीस किंवा 2015 च्या सुरुवातीला ही कार बाजारात येणार आहे. पाच सीटर. डिझेल मॉडेलही.
किंमत : 5.7 - 7.5 लाख
आता मारुतीचे ड्रायव्हिंग होणार आणखी सोपे
कारमध्ये गिअर असतील, पण ते बदलण्यासाठी क्लचची गरज नाही. यासाठी इंजिनामध्येही बदल करण्यात आलेले नाहीत. हे तंत्रज्ञान फॉर्म्युला वन कारमध्ये वापरेल जाते.
फायदा : एक्सेलरेटर आणि ब्रेकशिवाय इतर क्रियांसाठी पाय हलवण्याची गरज नाही. त्यामुळे ताण कमी होईल. या तंत्रज्ञानामुळे मायलेजवर फार फरक पडणार नाही, असा मारुती कंपनीचा दावा आहे. तसेच या प्रणालीसाठी कारच्या किमतीत फार बदल नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
मारुती सर्वप्रथम : 1987 मध्ये मारुती कंपनीने भारतात सर्वप्रथम ऑटोमॅटिक कार आणली होती. मारुती 800 मध्ये तेव्हा अपंगांसाठी विशेष बदल करण्यात आले होते. मात्र, यासाठी कंपनीने कारची किंमतही जास्त ठेवली होती.