आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile: Nissan Motor Introduced Macra Car In Market

वाहन उद्योग: निस्सान मोटरची देखण्‍या रूपड्यातील ' मायक्रा ' कार बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारातील मरगळ बघता ग्राहकांमध्ये पुन्हा खरेदीची नवी उमेद जागवण्यासाठी मोटार कंपन्यांची धडपड सुरू झाली आहे. मागच्याच आठवड्यात मारुती सुझुकीने चेहरामोहरा बदललेली तीन वाहने पुन्हा नव्याने बाजारात आणली. आता त्याच पावलावर पाऊल टाकत निस्सान मोटर या जपानच्या कंपनीनेदेखील आपल्या मायक्रा मोटारीचे रुपडे बदलून ती आणखी आकर्षक किमतीमध्ये पुन्हा बाजारात सादर केली आहे.


केवळ मायक्राच नाही तर त्यासोबत ‘स्पोर्टी लूक’ असलेली ‘मायक्रा अ‍ॅक्टिव्ह’ चार प्रकारांत बाजारात आणली आहे. लवकरच ही मोटार अकरा प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘मायक्रा अ‍ॅक्टिव्ह’ मोटार ‘ब’ गटातील मारुती स्विफ्ट, होंडा ब्रायो या मोटारींशी स्पर्धा करणार तर आहेच, पण शिवाय शेव्हरोले बीट, फोर्ड फिगो, मारुती वॅगन या मोटारींच्या ग्राहकांनादेखील आकर्षित करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


निस्सानची ‘ मायक्रा’ ही भारतीय बनावटीची मोटार जुलै 2010 मध्ये पहिल्यांदा बाजारात दाखल केली. त्यानंतर गेल्या तीन वर्षात कंपनीने जवळपास 43 हजार मायक्रा मोटारींची विक्री केली आहे. नवीन मायक्रादेखील वाहन बाजारात नवे आकर्षण ठरणार आहे. त्यामुळेच महिन्याला 2,500 नवीन मायक्रा मोटारींची विक्री करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले असल्याचे कंपनीचे अध्यक्ष केनिचिरो योमुरा यांनी अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले.


मायक्रा अ‍ॅक्टिव्हची वैशिष्ट्ये
० स्पोर्टी बाह्यभाग, पुढील बाजूच्या बंपरचे नवीन डिझाइन
० वाहनाचे एकूण वजन 30 किलोने कमी
० इंधन क्षमता प्रतिलिटर 19.49 लिटर
० ड्युएल एअरबॅग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक
० रंगसंगती : तुरकोज ब्ल्यू, ब्लेड सिल्व्हर, स्टॉर्म व्हाइट, ओनिक्स ब्लॅक, अ‍ॅक्वा ग्रीन, ब्रिक रेड
० किंमत : 350000 रु. (एक्सई), 40,1699 (एक्सएल), 439881 (एक्सव्ही), 471061 (एक्सव्ही सेफ्टी)