आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile Sales Up In October On Festive Season

वाहन विक्रीची ऑक्टोबरमध्ये धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- गेले आठ महिने घसरणीच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणारी वाहन विक्रीची गाडी दिवाळीच्या खरेदीने पुन्हा रुळांवर आली आहे. वाहन निर्मिती करणा-या प्रमुख कंपन्यांच्या ऑक्टोबरमधील विक्रीत वाढ दिसून आली. त्यामुळे वाहन उद्योगात काहीसे चैतन्य आले आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड : कंपनीच्या एकूण मोटार विक्रीत 1.91 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1,03,109 वरून 1,05,087 मोटारींवर गेली आहे. एम 800, अल्टो, ए-स्टार, वॅगन आर : 39,379 (42,233 : सप्टेंबरमधील विक्री), स्विफ्ट, एस्टिलो, रिट्झ : 17,211 (14,389) , डिझायर : 17,211 (14,389); एसएक्स 4 : 262 (695), जिप्सी, ग्रॅँड व्हिटारा, अर्टिगा : 7,236 (7,400), ओम्नी, एको : 9,786 (8,791).

टीव्हीएस मोटर : टीव्हीएस मोटारीच्या एकूण वाहन विक्रीत 3.92 टक्क्यांनी वाढ होऊन ती 1,97,905 वाहनांवर गेली आहे. अगोदरच्या वर्षात याच कालावधीत 1,90,438 वाहनांची विक्री झाली होती.

हीरो मोटोकॉर्प : कंपनीच्या दुचाकी विक्रीमध्ये 18.17 टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यातील 5,29,215 दुचाकींवरून 6,25,420 दुचाकींवर गेली आहे.

जनरल मोटर्स इंडिया : ऑक्टोबरमधील विक्री 14.22 टक्क्यांनी वाढून 6,754 मोटारींवरून 7,715 मोटारींवर गेली आहे.

सुझुकी मोटारसायकल : कंपनीच्या विक्रीत 9.26 टक्क्यांनी वाढ होऊन ती 39,562 वाहनांवर गेली आहे. अगोदरच्या वर्षात कंपनीने 36,206 वाहनांची विक्री केली होती.

यामाहा मोटर इंडिया : कंपनीने ऑक्टोबर महिन्यात 64,552 मोटारसायकलींची विक्री केली आहे. आधीच्या वर्षात याच कालावधीत त्49,522 मोटारसायकलींची विक्री झाली होती.

टोयोटा किर्लोस्कर मोटर : कंपनीची मोटार विक्री 10.94 टक्क्यांनी वाढून ती 14,040 मोटारींवरून 15,576 मोटारींवर गेली आहे. इनोव्हा, एटिऑस, लिव्हा, फॉर्च्युनर, कोरोला, अल्टीस च्या विक्रीत सकारात्मक वाढ

फोर्ड इंडिया : कंपनीने यंदा ऑक्टोबर महिन्यात 14,935 मोटारींची एकूण विक्री केली आहे. मागील वर्षातल्या तुलनेत ती 36.41 टक्क्यांनी घसरली.

ह्युंदाई मोटर इंडिया : कंपनीच्या एकूण विक्रीत 14.58 टक्क्यांनी घसरण झाली. मागील ऑक्टोबर महिन्यातील 58,784 तुलनेत यंदा 50,212 मोटारींची विक्री झाली.