आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Automobile: Yoga Seat Lauxuary Mahindra Quanta Introduced In Market

Automobile: योगा सीट्ची आरामदायी 'महिंद्रा क्वांटो' बाजारात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वीकेंडचे लाँग ड्राइव्ह अधिक सुखकर करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने आपल्या क्वांटो या एसयूव्हीमध्ये जागतिक दर्जाची लवचीक आसनव्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ही नवीन आसन व्यवस्था ‘योगा सीट्स’ या नावाने ओळखली जाणार आहे. चार मीटरपेक्षा कमी लांबी असलेल्या गाड्यांमध्ये 5+2 योगा आसनव्यवस्था असणारी ही एकमेव एसयूव्ही ठरली आहे.
या नव्या लवचीक ‘योगा सीट्स’मुळे क्वांटोमध्ये बसल्यानंतर शहरात, महामार्गांवर, आडमार्गांवर कुठेही असताना आरामदायी सफरीचा आनंद मिळेल. यातील सामानाच्या अधिक जागेमुळे तुम्ही अधिक सामान स्वत:बरोबर नेऊ शकता, वीकेंडसाठी अधिक सामग्री बाळगू शकता आणि सुटीची अधिक मजा लुटू शकता, असे कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी विवेक नायर यांनी सांगितले.