Home | Business | Auto | automobiles, maruti,

तोडगा निघालाच नाही; ‘मारुती’तील संप सुरूच

Agency | Update - Jun 16, 2011, 06:05 AM IST

वृत्तसंस्थाहरियाणा श्रम मंत्रालयाचे अधिकारी, मारुती-सुझुकी कंपनी व्यवस्थापन आणि संपकरी कामगार यांच्यात झालेल्या चर्चेतून संप मिटवण्याबाबत सुयोग्य तोडगा न निघाल्याने मारुतीच्या मनेसर कारखान्यातील संप १२व्या दिवशीही सुरूच राहिला.

  • automobiles, maruti,

    नवी दिल्ली: हरियाणा श्रम मंत्रालयाचे अधिकारी, मारुती-सुझुकी कंपनी व्यवस्थापन आणि संपकरी कामगार यांच्यात झालेल्या चर्चेतून संप मिटवण्याबाबत सुयोग्य तोडगा न निघाल्याने मारुतीच्या मनेसर कारखान्यातील संप १२व्या दिवशीही सुरूच राहिला.
    परिस्थिती ‘जैसे थे’ असून उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याचे ‘मारुती’च्या प्रवक्त्याने सांगितले. संप सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत १०,२०० कारचे उत्पादन होऊ शकले नाही. त्यामुळे कंपनीचे ५१० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही या प्रवक्त्याने सांगितले.
    दरम्यान, हरियाणा श्रम मंत्रालयातील अधिकाºयांनी कंपनी व्यवस्थापन तसेच संपकरी कामगार यांच्याशी वेगवेगळी चर्चा केली, पण त्यातून मार्ग निघाला नाही. कामगार आयुक्त व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना घेऊन चर्चेसाठी येतील असे वाटले होते, पण तसे घडले नाही, असे नव्याने स्थापन झालेल्या मारुती सुझुकी एम्प्लॉइज युनियनचे महासचिव शिवकुमार यांनी सांगितले.Trending