आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spicejet Offers One Time Journey On Rs 1499 For 5 Lacks Tickets

Spicejet कडून उद्यापर्यंत 1499 रुपयांची 5 लाख तिकिटे, वाचा तुमच्या फायद्याच्या तीन बातम्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एअरलाईन कंपनी स्पाइस जेटने केवळ 1499 रुपयांत हवाई प्रवासाची आकर्षक ऑफर दिली आहे. कालपासून (बुधवार) उद्यापर्यंत (शुक्रवार) या किमतीत सुमारे पाच लाख तिकिटे विकली जाणार आहेत. ऑफरमध्ये विकल्या गेलेल्या तिकिटांवर तुम्ही 15 फेब्रुवारीपासून 30 जूनपर्यंत प्रवास करु शकता, असे सांगण्यात आले आहे.
तुमच्या फायद्याच्या इतर दोन बातम्या...
आता ट्विटरवरही होणार ग्रुप मेसेज आणि चॅट- ट्विटरवरुन आता एका वेळी 20 जणांना मेसेज पाठवता येईल. याची सुरवात ट्विटरवर करण्यात आली आहे. यासोबत ग्रुप चॅट, व्हिडिओ कॅप्चर, एडिट आणि शेअर करण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे.
यावर्षी 11.3 टक्के पगार पाढिची शक्यता- या आर्थिक वर्षात 11.3 टक्के पगार वाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात सर्वाधिक पगार वाढ एफएमसीजी आणि केमिकल्स या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कन्सलटंसी फर्म हे ग्रुपने हा दावा केला आहे. 2014 मध्ये वेतन वाढीची सरासरी 10.9 टक्के होती.