आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडी व्याजात वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने निवडक मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 0.30 टक्के वाढ केली. नवे व्याजदर शुक्रवारपासून लागू झाले आहेत.
नव्या व्याजदरानुसार 18 महिन्यांपेक्षा जास्त व दोन वर्षांपेक्षा कमी, दोन वर्षांपेक्षा जास्त आणि 30 महिन्यांपेक्षा कमी, 30 महिन्यांपेक्षा जास्त व तीन वर्षांपेक्षा कमी तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी अवधींच्या मुदत ठेवींवर आता 9.30 टक्के व्याज मिळणार आहे. वाढीपूर्वी या एफडींवर 9 टक्के व्याज मिळायचे. सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँका व्याजदर कमी करत असताना तसेच उद्योग जगत कर्जावरील व्याज कमी करण्याची मागणी करत असताना अ‍ॅक्सिस बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेतील जमा ठेवींचे प्रमाण वाढले, तर कर्जावरील व्याजदरांवर विपरीत परिणाम होत नसल्याचे अ‍ॅक्सिस बँकेचे म्हणणे आहे. इतर बँका मात्र नेमके याउलट मतप्रदर्शन करत आहेत. बँकेच्या भांडवलवाढीसाठी हे करत असल्याचे अ‍ॅक्सिसचे मत आहे. एफडींवरील व्याजदर वाढवल्याने जास्तीत जास्त लोक बँकेत ठेवी ठेवतील. व्याजदरातील वाढ मर्यादित काळासाठी असल्याचे अ‍ॅक्सिस बँकेने स्पष्ट केले.