शेतकर्‍यांसाठी अ‍ॅक्सिस बँकेचे / शेतकर्‍यांसाठी अ‍ॅक्सिस बँकेचे नवे ‘किसान कार्ड’

प्रतिनिधी

Mar 28,2014 03:00:00 AM IST

मुंबई - खासगी क्षेत्रातील अग्रणी अ‍ॅक्सिस बँक ऑफ इंडियाने शेतकर्‍यांसाठी नवीन किसान कार्ड बाजारात आणले आहे. रुपेच्या तंत्रज्ञान व्यासपीठावर आणण्यात आलेले खासगी बँकिंग क्षेत्रातले हे पहिले इलेक्ट्रॉनिक किसान कार्ड आहे. या कार्डाच्या माध्यमातून देशभरातील शेतकर्‍यांना 24 तास वित्तीय पुरवठा सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी ग्राहकांना बँकेच्या शाखेत न जाता एटीएमच्या माध्यमातून रोख रक्कम काढता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर आपल्या कर्ज मर्यादा रकमेपैकी प्रतिदिन एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम शेतकर्‍यांना काढता येऊ शकणार आहे.

साधारणपणे डेबिट कार्ड हे बचत आणि चालू खात्याशी जोडले गेले असते; परंतु किसान क्रेडिट कार्ड शेतकर्‍यांच्या पीक कर्ज खात्याशी जोडले गेले असल्याने व्यवहार करण्यासाठी त्याला शाखेत जाण्याची गरज भासत नाही. सध्या बँक शाखेत जाऊन व्यवहार करण्याचे प्रमाण 90 ते 95 टक्के आहे; परंतु या नव्या पर्यायाच्या माध्यमाकडे 30 ते 40 टक्के शेतकरी स्थलांतरित होतील, अशी माहिती बँकेच्या रिटेल विभागाचे कार्यकारी संचालक आर. के. बमानी यांनी सांगितली.

X
COMMENT