आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Azim Premji: Balance 'must' Between Manufacturing And Services Sector

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्मिती-सेवा क्षेत्रात संतुलन ठेवा : अझीम प्रेमजी यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- निर्मिती क्षेत्रातील मरगळ लक्षात घेऊन सेवा क्षेत्र व निर्मिती क्षेत्रात संतुलन राखणे आवश्यक असल्याचे मत विप्रो टेक्नॉलॉजीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केले.


विकसित देशांप्रमाणे सकल राष्ट्रीय उत्पादनात सेवा क्षेत्राचा वाटा 58 टक्के असल्याचे आश्चर्यजनक चित्र असल्याचे निरीक्षण नोंदवत प्रेमजी म्हणाले, दुर्दैवाने निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राची जागा सेवा क्षेत्राने घेतली आहे. निर्मिती क्षेत्राचा विस्तार संकुचित झाल्याने हे चित्र देशभरात आहे. आर्थिक विकासासाठी सेवा क्षेत्राचा विस्तार आनंददायी असला तरी निर्मिती क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या 10 वर्षांपासून निर्मिती क्षेत्राकडे हवे तसे लक्ष दिले जात नसल्याकडे लक्ष वेधत सेवा आणि निर्मिती क्षेत्रात संतुलन असावे, असे ते म्हणाले.