Home | Business | Auto | bajaj auto, discover, bike, sale in maharashtra

बजाजने महाराष्ट्रात विकल्या तीन लाख डिस्कव्हर

Agency | Update - Jun 05, 2011, 04:01 AM IST

बजाज आॅटो लिमिटेडने सर्वोत्तम विपणन धोरण राबवून मागील २३ महिन्यांत महाराष्ट्रात तीन लाख डिस्कव्हर मोटारसायकल विकण्याचा विक्रम केला आहे.

  • bajaj auto, discover, bike, sale in maharashtra

    वृत्तसंस्था । कोल्हापूर : बजाज आॅटो लिमिटेडने सर्वोत्तम विपणन धोरण राबवून मागील २३ महिन्यांत महाराष्ट्रात तीन लाख डिस्कव्हर मोटारसायकल विकण्याचा विक्रम केला आहे.
    कंपनीच्या पश्चिम क्षेत्राचे विक्री प्रमुख विमल संबली यांनी सांगितले की, कंपनीने फक्त २३ महिन्यांत विक्रीचे हे उद्दिष्ट साध्य केले आहे. मागील एका वर्षात कंपनीने राज्यात एक लाख डिस्कव्हर मोटारसायकल विकल्या तर पुढील एक लाख मोटारसायकल मागील सहा महिन्यांत आणि बाकी एक लाख डिस्कव्हर मागील पाच महिन्यांत विकण्यात आल्या. कमी इंधन वापर, गुणवत्ता आणि कमी देखभाल खर्चामुळे डिस्कव्हरच्या विक्रीत ही विक्रमी वाढ झाली आहे. हा ब्रॅण्ड जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅण्ड बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Trending