आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Auto Likely To Raise Motorcycle Prices Soon

बजाज ऑटोच्या वाहनांच्या किमती वाढणार; राजीव बजाज यांचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने शेअरबाजारापासून अन्य व्यापारापर्यंत विपरित परिणाम दिसून येत आहे. रुपयाचे सातत्याने होणार्‍या घसरणीचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला आहे. परिणामी वाहन निर्मिती क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे बजाज ऑटो लिमिटेडने आपल्या वाहणाच्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले आहे.

एका व्यापारी मेळाव्यात बोलताना बजाज ऑटोचे संचालक राजीव बजाज यांनी वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याचे संकेत दिले. बजाजच्या वाहणांच्या किंमती केव्हा आणि किती टक्क्यांत वाढतील याबाबत मा‍त्र त्यांनी सांगितले नाही.