आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bajaj Auto Says Workers Call Off Strike At Chakan Plant

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देर आये, दुरुस्त आये : बजाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बजाज ऑटोच्या चाकण प्रकल्पातील कामगारांनी गेले 50 दिवस सुरू केलेला संप मागे घेतला, ही गोष्ट देरसे आये, दुरुस्त आये, अशी आहे. कामगारांनी दाखवलेल्या समजूतदारपणाची जाणीव कंपनी व्यवस्थापनाला आहे, अशी प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

कंपनीत गेले 50 दिवस एक हजार कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. परिणामी चाकण प्रकल्प कंत्राटी कामगारांकडे सोपवण्यात आला होता. तसेच निम्मे उत्पादन औरंगाबाद येथील प्रकल्पात हलवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कामगारांनी आपला संप मागे घेतला. चाकण येथील बहुसंख्य कामगारांची संघटनेच्या आंदोलनाला संमती नव्हती आणि विश्व कल्याण कामगार संघटनेला आंदोलन मागे घ्यायला लावण्यामागे हेच कारण होते, असेही बजाज यांनी म्हटले आहे. दरम्यान, निलंबित 22 कर्मचार्‍यांची चौकशीही वस्तुनिष्ठपणे व सहानुभूतीपूर्वक केली जाईल.