आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजाज कामगारांना 10 हजार वेतनवाढ? चाकण प्रकल्पासाठी प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कंपनी आणि कामगार संघटनांतील वाद सोडवण्यासाठी बजाजने चाकण प्रकल्पातील कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या मुद्दय़ावर कामगार संघटना आणि श्रमिक एकता महासंघाची बैठक बोलावली असतानाच कामगारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

वेतनवाढ आणि 20 कामगारांना कामावर घेण्याची त्यांची मागणी आहे. चाकण प्रकल्पातील 950 कायम, तर 1 हजार कंत्राटी कामगारांची ही संघटना आहे. कामगारांनी मागण्यांसाठी यापूर्वी ‘काम बंद’ केले होते.