आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजाजची आरई-60 कार लवकरच रस्त्यावर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बजाजच्या कारची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनीच्या औरंगाबाद येथील प्रकल्पात महिन्याकाठी 5000 आरई -60 कार तयार करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी शुक्रवारी दिली. ‘क्वाड्रिसायकल’ श्रेणीत येणार्‍या बजाजच्या आरई-60 कारच्या व्यावसायिक उत्पादनाला केंद्र सरकारच्या समितीने तत्त्वत: मान्यता दिल्याचे बजाज यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘क्वाड्रिसायकल’ वाहनांच्या व्यापारी उत्पादनात केंद्राने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आरई-60च्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला. महिन्याला 5000 कारचे उत्पादन करण्याची योजना आहे. वाळूज कारखान्यात या कारचे उत्पादन होणार आहे. कारच्या किमतीविषयी काहीही सांगण्यास बजाज यांनी नकार दिला.

औरंगाबादचा मान
बजाज ऑटोच्या वाळूज येथील कारखान्याचे बजाजच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वाचे स्थान आहे. अवघ्या देशाला भुरळ घालणार्‍या व ‘हमारा बजाज’ मनामनात रुजवणार्‍या बजाज स्कूटरचे पहिले उत्पादन वाळूज येथील कारखान्यात झाले. त्याच कारखान्यात बजाज आपल्या पहिल्या चारचाकीचे उत्पादन करणार आहे.

केंद्राची तत्त्वत: मान्यता
चारचाकी वाहनाच्या ‘क्वाड्रिसायकल’ श्रेणीला केंद्र सरकारच्या समितीने तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे बजाज ऑटोचे अध्यक्ष (व्यावसायिक वाहने) आर. सी. माहेश्वरी यांनी सांगितले. ते म्हणाले, समिती आता या श्रेणीसाठीची नियमावली तयार करत आहे. येत्या काही महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.

क्वाड्रिसायकल काय आहे :
‘क्वाड्रिसायकल’ हा तीन व चारचाकी वाहनांचा सुवर्णमध्य आहे. यात तीनचाकीची सर्व सूत्रे वापरून सुरक्षित कार तयार करण्यात येते. 1890 मध्ये हेन्री फोर्ड यांनी पहिली क्वाड्रिसायकल कार तयार केली.

पुढे काय ?
औरंगाबादेत महिन्याकाठी 5000 कारचे उत्पादन करण्याची बजाजची योजना आहे. त्यामुळे औरंगाबादेतील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन रोजगार निर्मिती होईल.