आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Small Car Run On This Diwali, Production Starts In Aurangabad

बजाजची छोटी कार दिवाळीत धावणार, औरंगाबादेत होणार उत्पादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रेटर नोएडा - क्वाड्रिसायकल श्रेणीला सरकारकडून हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा असून आरई-60 मॉडेल तयार असल्याचे बजाज ऑटोने बुधवारी स्पष्ट केले. कंपनीच्या वाहन विभागाचे अध्यक्ष आर.सी. माहेश्वरी यांनी ही माहिती दिली. यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दसरा-दिवाळीत कार येण्याचे संकेत त्यांनी दिले. कारचे उत्पादन औरंगाबादेत होणार आहे. दोन वर्षांपूर्वी आरई-60 चे मॉडेल कंपनीने सादर केले होते. व्यावसायिक उत्पादनासाठी सरकारी परवानगीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्र मिळवावे लागणार असून त्यासाठी दोन ते चार महिने लागतील.
* क्वाड्रिसायकल म्हणजे काय?
ही चारचाकी वाहनांची श्रेणी आहे. हेन्री फोर्ड यांनी प्रथम क्वॉड्रिसायकल तयार केली. युरोपात सध्या तिला मान्यता आहे. वजन, वेग यावर मात्र बंधने आहेत.
* 200 कार दिवसाकाठी उत्पादित करण्याची प्रकल्पाची क्षमता.
* वाळूजमध्ये उत्पादन
बजाज ऑटोच्या औरंगाबादनजीकच्या वाळूज येथील प्रकल्पात आरई-60 कारची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पात सध्या तीनचाकी वाहनांची निर्मिती होते. तीनचाकी वाहनांपेक्षा याची किंमत जास्त राहील, असे माहेश्वरी यांनी सांगितले.