आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Udyog Group Investment In Aurangbad, Latest News In Marathi

औरंगाबादेत बजाजची दोन हजार कोटींची गुंतवणूक, रोजगार उपलब्ध होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बजाज उद्योग समूहाने २००० कोटींची गुंतवणूक करून औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीमधील आपल्या कारखान्याची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला. या
गुंतवणुकीमुळे २००० लोकांना रोजगार मिळणार आहे. एमआयडीसी आणि बजाजमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे.

राज्यात ऑटो हब तयार करण्यासाठी राज्य सरकारने बजाज, महिंद्रा, फॉक्सवॅगन आणि टाटा मोटर्स या चार कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी करारावर केल्या. या करारानुसार महिंद्रा व टाटा मोटर्स प्रत्येकी ४००० कोटी रुपये, बजाज २००० कोटी आणि फॉक्सवॅगन १५१० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे राज्यात ६२७० रोजगार उपलब्ध होणार आहे. बजाज पहिल्या टप्प्यात दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांची क्षमता २२ लाख ८० हजारांवरून ३३ लाख ६० हजार वाढवणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता ३८ लाख ४० हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

विकासाला चालना
बजाज उद्योगसमूहाचे कुणी प्रतिनिधी आले नसले तरी ही गुंतवणूक ते करणार आहेत. राजीव बजाज यांनी या कराराबद्दल शुभेच्छा देणारे पत्र पाठवले आहे. या गुंतवणुकीमुळे औरंगाबादमध्ये औद्योगिक विकासाला नवी चालना मिळणार आहे.
-अपूर्व चंद्र, प्रधान सचिव, उद्योग