आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ban On Kingfisher Shares Trading From 1 December

किंगफिशर शेअर्स ट्रेडिंगवर एक डिसेंबरपासून बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विजय मल्ल्याच्या यूबी समूहावरील फास आणखी आवळण्यात आला आहे. बीएसई आणि एनएसई बाजाराने समूहातील किंगफिशर आणि यूबी इंजिनिअरिंग या दोन कंपन्यांच्या समभागातील व्यवहारावर एक डिसेंबरपासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नोंदणी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे.

एकेकाळी मूल्यवान समजण्यात येणा-या किंगफिशरच्या समभागांची किंमत आता दोन रुपयेही राहिलेली नाही. याचे बाजार भांडवल अर्थात मार्केट कॅप केवळ १५० कोटी रुपयांवर आले आहे. आर्थिक संकटात अडकण्यापूर्वी याचे बाजारमूल्य १० हजार कोटी रुपयांहून जास्त होते. किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे. यूबी इंजिनिअरिंगच्या शेअरचा भाव आठ रुपयांच्या आसपास आहे. वर्ष २०१२-१३ मध्ये किंगफिशर एअरलाइन्सचा तोटा ४,३०१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. कंपनीवर १७ बँकांचा या समूहाच्या डोक्यावर ६,५२१ कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे.

प्रवर्तकांचे समभाग गोठवले
दोन्ही कंपन्यांच्या प्रवर्तकांचे समभाग गोठवण्यात आले आहेत. आता प्रवर्तकांना याची विक्री करता येणार नाही. किंगफिशरच्या प्रवर्तकांची होल्डिंग केवळ ८.५४ टक्के आहे. उर्वरित ९१.४६ टक्के हिस्सा बिगर प्रवर्तकांचा आहे. यात दोन लाखांपेक्षा जास्त छोटे गुंतवणूकदार, सुमारे ६००० अतिश्रीमंत लोक, २००० हून जास्त एनआरआय आणि १३ एफआयआय यांचा समावेश आहे. यूबी इंजिनिअरिंगमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ४०.७४ टक्के आहे.