आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाला बँक खाते 15 ऑगस्टपासून, दुसर्‍या टप्प्यात विमा-पेन्शन योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वांसाठी बँक सेवा या उद्देशाने वित्त मंत्रालय 15 ऑगस्टपासून एक राष्ट्रीय अभियान हाती घेणार आहे. देशातील सर्व कुटूंबांना बँकेशी जोडणे विशेषत: समाजातील कमकुवत वर्गाला बँक सेवांचा लाभ देण्यावर भर राहणार आहे. वित्त मंत्रालय या अभियानासाठी एक विशेष लोगो, नाव आणि ब्रीदवाक्य तयार करणार असून त्यासाठी जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या संदर्भातील कल्पना 7 ऑगस्टपर्यंत पाठवायच्या आहेत. निवडलेल्या संकल्पनासाठी 50 हजारांचे बक्षीस आहे. हे अभियान दोन टप्प्यांत राहील. 15 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या पहिल्या टप्प्यात सर्वाकडे बँक खाते असण्यावर भर राहील. या खात्यासाठी 5 हजार
रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधा, डेबिट कार्ड आणि एक लाखाचा अपघात विमा राहील. 15 ऑगस्ट 2015 पासून सुरू होणार्‍या दुसर्‍या टप्प्यात विमा आणि पेन्शन योजनांवर भर राहील.