मुंबई- बँक खाते उघडण्यासाठी आता कायम रहिवासी पुरावा देण्याची गरज भासणार नाही. सध्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा पुरावा देऊनही खाते उघडता येईल. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातील नियम आणखी सुटसुटीत केले आहेत.
रिझर्व्ह बँकेने सोमवारी या संदर्भातील पत्रक जारी केले. त्यानुसार बँकेत खाते उघडण्यासाठी आता एकच रहिवासी पुरावा द्यावा लागेल. पत्त्यात बदल झाला असेल तर सहा महिन्यांच्या आत त्याची सूचना संबंधित बँक शाखेला देणे आवश्यक आहे.
बदल का : प्रवासी कामगार आणि बदलीमुळे सातत्याने शहर, जागा बदलावी लागणार्या कर्मचार्यांची अडचण लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.