आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅंकांचा सर्व्हिस चार्ज वाढतोय, जाणून घ्या कोणत्या शुल्कात किती होईल वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एटीएम ट्रान्झॅक्शनवरील शुल्कात वाढ करण्याचा बॅंकांकडून सध्याच विचार होत नसला तरी इतर सेवाशुल्कात वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. आता बॅंकेतून ड्युप्लिकेट पीन घ्यायचे असेल किंवा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा असेल तर आपल्याला अधिक पैसे मोजावे लागतील. आपण केलेल्या ट्रान्झॅक्शनसंदर्भात मिळत असलेल्या एसएमएस अॅलर्टवरही अधिक पैसे देण्याची तयारी आता आपल्याला ठेवावी लागेल.
एक्सिस बॅंक, धनलक्ष्मी बॅंक आणि सिटी युनियन बॅंक सेवाशुल्कांत 1 एप्रिलपासून बदल करणार येणार आहे. त्यामुळे प्रत्येक सेवेवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होणार आहे. युनियन बॅंक आणि एसबीआयनेही नुकतीच सेवाशुल्कात वाढ केली होती. सध्याच एटीएम ट्रॅन्झॅक्शन शुल्कावर काही निर्णय झालेला नाही. आरबीआयच्या समितीने बॅंकांकडून ट्रान्झॅक्शन शुल्कात वाढ करण्याबाबत येत्या 15 दिवसांत प्रस्ताव मागितला आहे.
पुढे जाणून घ्या कोणत्या बॅंकेने कोणकोणत्या सेवाशुल्कात वाढ केली आहे.
एक्सिस बॅंक
- जर तुमचे ईसीएस डेबिट फेल झाले तर आपल्याला 350 रुपये अदा करावे लागतील. यापूर्वी हे शुल्क केवळ 200 रुपये होते.
- जर बॅंकेतून ड्युप्लिकेट पीन हवे असेल तर 100 रुपये शुल्क आकारण्यात येईल.
- जर तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलेंस नसेल तर आपल्याला प्रत्येक महिन्याला 250 रुपये द्यावे लागतील.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर बॅंकांचे सेवाशुल्का...