आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेबिट कार्डच्या व्यवहारांना मर्यादा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आर्थिक घोटाळ्यांना लगाम घालण्याच्या उद्देशाने क्रेडिट आणि डेबिट कार्डांवरील आंतरराष्ट्रीय व्यवहारांना आर्थिक मर्यादा घालाव्यात असे आदेश भारतीय रिझर्व्ह बॅँकेने दिले आहेत.

ग्राहकाकडून जोपर्यंत विशेष मागणी केली जात नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहार करण्याची सुविधा असलेली कार्डे देणे टाळण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

या अगोदर वापरण्यात न आलेल्या सर्व जागतिक डेबिट, क्रेडिट कार्डांवर 500 डॉलरची आर्थिक व्यवहार र्मयादा घालण्यात आलेली असल्याचे आरबीआयने म्हटले. बॅँकांकडून वितरित सर्व सक्रिय मेगास्ट्रिप इंटरनॅशनल कार्डांना आंतरराष्ट्रीय वापरासाठी ही र्मयादा असेल. संबंधित ग्राहकाच्या जोखमीचा अंदाज घेऊन बँकांनी ही र्मयादा ठरवावी. सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आदेश बॅँकांना देण्यात आला. डेबिट, क्रेडिट कार्डांमध्ये सुरक्षा उपायांचा समावेश करतानाच बॅँकांनी घोटाळ्यांवर देखरेख करणारी प्रणाली आणावी त्याचप्रमाणे कार्डधारकाने एसएमएस पाठवल्यानंतर ते कार्ड ‘ब्लॉक’ होण्याच्या दृष्टीने यंत्रणा तयार करावी असेही रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे.