आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक समभागांवर म्युच्युअल फंड फिदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बँकिंग क्षेत्राला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केलेल्या विविध उपाययोजना तसेच शेअर बाजारातील तेजीचे वातावरण यामुळे म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांच्या बँक समभागांमधील व्यवहार डिसेंबरमध्ये 34 हजार कोटी रुपयांवर गेले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे.
बाजार नियंत्रक सेबीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार म्युच्युअल फंडांची बॅँक समभागांमधील गुंतवणूक डिसेंबर महिन्यात 34,153 कोटी रुपयांवर गेली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या 1.93 लाख कोटी रुपयांच्या एकूण समभाग मालमत्तेच्या तुलनेत हे प्रमाण 17.66 टक्के आहे. याअगोदर मागील वर्षाच्या जून महिन्यात म्युच्युअल फंडांनी 35.442 कोटी रुपयांची सर्वाधिक गुंतवणूक बॅँक समभागांमध्ये केली होती. त्याअगोदर नोव्हेंबरमध्ये हीच गुंतवणूक 32,417 कोटी रुपये झाली होती.
एकूणच बाजारात आलेली तेजी आणि रुपयाला स्थिर करतानाच बॅँकिंग यंत्रणेत आणखी उदारीकरण आणण्यासाठी शाखा उघडण्याची प्रक्रिया सुलभ करणे यासह रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलेल्या विविध उपायोजनांमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत म्युच्युअल फंडांनी बँक समभागांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त स्वारस्य दाखवल्याचे भांडवल बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. गुंतवणुकीचा ओघ वाढल्यामुळे बॅँक निर्देशांक डिसेंबरमध्ये 2.13 टक्क्यांनी वाढला होता.
म्युच्युअल फंडांची अन्य समभागांतील गुंतवणूक
* माहिती तंत्रज्ञान 26,762 कोटी
* फार्मा 15,603 कोटी रु.
* ग्राहकेतर वस्तू 13,186 कोटी रु.
* पेट्रोलियम 10,045 कोटी रु.