आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Of India Start Without Account ATM Withdrawal Service

बॅंक ऑफ इंडियाची \'आयएमटी\' सेवा सुरु; खात्याविनाही एटीएममधून काढा रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बँक ऑफ इंडियाने 'इन्स्टंट मनी ट्रान्सफर' (आयएमटी) सेवा सुरु केली आहे. या सेवेमुळे बॅंक अकाउंट नसतानाही बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून 'कार्डलेस कॅश विड्रावल' करता येणार आहे. 'आयएमटी' सेवा सुरु करणारी बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बॅंक ठरली आहे.

'आयएमटी' सेवेच्या माध्यमातून ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. त्यावर बँकेच्या एटीएम आणि रिटेल इंटरनेट बँकिंगच्या सुविधेच्या माध्यमातून पैसे पाठवता येतात. विशेष म्हणजे आपण ज्याला पैसे पाटवले त्याला 'बँक ऑफ इंडिया'च्या एटीएममधून कार्डाशिवाय पैसे काढता येतात. एटीएममधून पैसे काढण्यासाठी काढण्यासाठी त्याच्या मोबाइलवर ठराविक पिनकोड पाठविला जातो. त्या आधारावर त्याला पैसे काढता येतात.

बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा व्ही. आर. अय्यर यांनी या सेवेचे उद्घाटन केले. अय्यर म्हणाल्या, ग्राहकांसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी सरकारी मालकीच्या बँकांमधील ही पहिली बँक आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय सर्वसमावेशकतेच्या वृद्धीचे उद्दिष्टही यातून साध्य होते.

यासुविधेनुसार लाभार्थी आयएमटीच्या माध्यमातून महिन्याकाठी 25000 हजार रुपयांचा व्यवहार करता येईल. 10000 रुपयांपर्यंत एका ट्रान्झक्शनमध्ये काढता येतील. आयएमटी सुविधेचे शुल्क म्हणून प्रति ट्रान्झक्शन 25 रुपये आकारले जातील.