आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँक ऑफ महाराष्ट्रला चालू आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत 500.53 कोटी रुपये निव्वळ नफा मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात 40 टक्के वाढ झाली आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
मार्चअखेर बँक 220 नव्या शाखा सुरु करणार आहे, असे नमूद करून ते म्हणाले की बँकेचा प्रती कर्मचारी व्यवसाय वर्षापूर्वी केवळ आठ कोटी रुपये होता तो आता वाढून 12.68 कोटी रुपये झाला आहे. लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केल्याने हा परिणाम दिसतो आहे.
ठेवी 41 टक्के तर कर्जे 47 टक्के वाढली आहेत. अनुत्पादक कर्जांचे प्रमाणही 0.88 वरून 0.66 टक्के असे कमी झाले आहे. सध्याचा व्यवसाय पावणे दोन लाख कोटी रुपयांवरून दोन लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. देशातील आठ जिल्ह्यात आघाडीची बँक म्हणून आम्ही स्थान मिळविले आहे.
आगामी काळात ग्रामीण आणि निम शहरी भागात 72 नव्या शाखा उघडल्या जाणार आहेत असे स्पष्ट करून ते म्हणाले की हाँगकाँगमध्ये शाखा सुरु करण्यासाठी आम्ही रिझर्व बँकेकडे परवानगी मागितली आहे.
बँकेच्या महासुवर्ण आवर्ती ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून ग्राहक संख्या 20 हजारावर पोचली आहे. बँकेच्या बह्न्द्वाली गरजेची पूर्तता व्हावी यासाठी भागविक्री करण्याचा विचार असून त्यासाठी 200 कोटी रुपयांचे समभाग विकले जातील. हक्कभाग किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांना भागविक्रीचा पर्यायही खुला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.