आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bank Of Maharashtra's Gross Profit Increases Up To 90 Percent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक ऑफ महाराष्‍ट्राच्‍या निव्‍वळ नफ्यात 90 टक्‍क्‍यांची वाढ, नव्‍या 110 शाखा होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ महाराष्ट्र चालू आर्थिक वर्षात 110 नव्या शाखा राज्यात सुरु करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंह यांनी दिली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला 90 टक्के अधिक निव्वळ नफा झाला असून हा आकडा 140.46 कोटी रुपयांवरून 266.33 कोटी रुपये झाला आहे. ते म्हणाले, की एकूण ठेवी 32 टक्‍क्यांनी वाढून 105446.65 कोटी रुपयांवर गेल्या आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायात 36 टक्के वाढ होउन तो 188457 कोटी रुपये झाला आहे.

बँकेच्या आगामी योजनांबाबत श्री सिंह म्हणाले, की ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज आधारित महाआसरा ही नवी योजना पुढील महिन्यापासून सुरु केली जाणार आहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी एका आठवड्यात एका वेळी दोन कोटी रुपये रोख भरणा आणि 50 लाख रुपये रक्कम काढण्याची सुविधा घरपोच दिली जाणार आहे. त्यासाठी प्रती दोन लाख रुपयासाठी 125 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सदनिका खरेदी करताना भरावे लागणारे मुद्रांक शुल्क देता यावे यासाठी आधी निबंधक कार्यालयानजीक शाखात आणि नंतर सर्व शाखांत सुविधा सुरु केली जाणार आहे.

बँकेची भांडवली गरज भागावी यासाठी 2200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. ती रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळेल असा अंदाज आहे असेही त्यांनी सांगितले.