आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Profit Increase 43 % But Quateraly May Be Less

बँकांची कमाई 43 टक्क्यांनी वाढणार; तिमाहीत मात्र नफा घटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यंदा वार्षिक आधारावर बँकिंग क्षेत्राचा नफा तब्बल 43 टक्क्यांची उडी घेण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बँकांच्या अँसेट क्वॉलिटीवर वाढत्या दबावामुळे पहिल्या तिमाहीत बँकांच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. स्टॅनचार्ट सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे की, 2012-13 वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून 2012 मध्ये तिमाही आधारावर बँकांच्या नफ्यात 11 टक्क्यांची घट येऊ शकते.
स्टॅनचार्ट सिक्युरिटीजचे महारूख अदजानिया आणि रौनक अग्रवाल यांनी तयार केलेल्या या अहवालानुसार, कर्ज पुनस्र्थापना आणि इतर कारणांमुळे सार्वजनिक बँकांच्या नफ्यावर दबाव येऊ शकतो. वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीत सार्वजनिक बँकांच्या नफ्यावर अधिक दबाव दिसून येऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बँकांपेक्षा खासगी बँकांची कमाई अधिक असू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे वार्षिक आधारावर खासगी बँका 43 टक्क्यांपर्यंत विकासदर गाठू शकतात, असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.