आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज स्वस्त करण्याची बँकांची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पाव टक्का कपातीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच युनायटेड बँकेसह युनियन बँक ऑफ इंडियाने आपले कर्ज स्वस्त केले आहे. युनायटेड बँकेचे नवे व्याजदर एक फेब्रुवारीपासून लागू होतील, तर युनियन बँकेचे नवे व्याजदर २७ जानेवारीपासून लागू होतील. एसबीआयसह इतर प्रमुख बँकांनी कर्ज स्वस्त करण्याचे संकेत दिले आहेत.

युनायटेड बँक तसेच युनियन बँक ऑफ इंडियाने कर्जावरील बेस रेट ०.२५ टक्क्यांनी घटवून १० टक्क्यांवर आणला आहे. ठेवींवरील व्याज कमी होणार बँका आता मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. तसे संकेत एसबीआय, आयसीआयसीआयसह प्रमुख बँकांनी दिले आहेत. युनियन बँकेने तर निवडक एफडींवरील व्याज ०.१० ते ०.५० टक्क्यांनी कमी केले आहेत. एकीकडे कर्ज स्वस्त होत असताना एफडीवरील व्याजातही घट होणार आहे.

एसबीआय तयारीत
कर्ज स्वस्त करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले, बँक ठेवी तसेच कर्जावरील व्याजदरात कपात करण्याच्या विचारात आहे. त्याबाबत चर्चा होईल. मात्र, ही कपात केवळ एक सुरुवात राहील.

उद्योगांसाठी दिलासा
बँक ऑफ महाराष्ट्रने काही दिवसांपूर्वीच कर्जावरील बेस रेट ०.१५ टक्क्यांनी कमी केले आहेत. आता लघु तसेच मध्यम उद्योगांसाठी देण्यात येणा-या कर्जावरील व्याजात कपातीचा प्राधान्याने विचार होईल.
एस. मुहनोत, चेअरमन, बँक ऑफ महाराष्ट्र.