आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Transaction Working On March End, News In Marathi

मार्च एडिंगला सुटी! तरीही बॅंकांचे व्यवहार राहणार सुरुच; करभरण्यासाठी शेवटचे 3 दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रतिवर्षी 31मार्च रोजी बँकांचे ऑडिट तपासणीसाठी बँकांचे व्यवहार बंद ठेवले जातात. मात्र, यंदा देशातील सर्व बँकांचे व्यवहार सुरु ठेवण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे. विशेष म्हणजे अधिकाधिक करदात्यांना वेळेत कर भरता यावा, या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. शनिवारपासून सलग तीन दिवस बॅंकांचे व्यवहार सुरु राहणार आहेत.

करदात्यांना कर भरण्यासाठी पुढील तीन दिवसांचे कामकाज रात्री आठ वाजेपर्यंत सुरु राहिल, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या सुत्रांनी दिली आहे.