आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Woman Staff News In Marathi, Finance Ministry, Divya Marathi

सार्वजनिक क्षेत्रातील महिला बँक कर्मचा-यांना आता बदली करून घेता येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील महिला बँक कर्मचा-यांना आता सोय पाहून आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करून घेता येणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक सेवा विभागाने बँकप्रमुखांना महिला कर्मचा-यांच्या बदल्यांबाबत धोरण करण्यास सांगितले आहे. विवाहित महिला कर्मचा-यांनी विनंतीवरून त्यांच्या पतीच्या कामाच्या ठिकाणी अथवा तेथून अधिक जवळच्या ठिकाणी त्यांची बदली अथवा नियुक्ती करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.
अविवाहितांना पालकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सामावून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. देशात सार्वजनिक क्षेत्रातील 27 बँका असून 8 लाखांपैकी अडीच लाख महिला कर्मचारी आहेत.