आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहज भांडवल देणारी रचना हवी, पुण्यातील ज्ञानसंगम परिषदेतील सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रीयीकृत बँकांच्या सक्षमीकरणासाठी केवळ अधिग्रहण आणि विलीनीकरण हाच एकमेव मार्ग नाही, तर त्यांच्या ताळेबंदात सुधारणा करण्याबरोबरच त्यांना सहज भांडवल उपलब्ध होऊ शकेल, अशी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे मत वित्त सेवा सचिव हसमुख आधिया यांनी पुण्यात सुरू असलेल्या दोन दिवसांच्या बँक परिषदेत व्यक्त केले.

राष्ट्रीयीकृत बँकांचे सक्षमीकरण म्हणजे आम्ही केवळ विलीनीकरण आणि अधिग्रहणाबाबतच विचार करतोय असा अर्थ घेऊ नये. जर आपण बँकांना पुरेसे पाठबळ दिले, बँकांनी जर पूरक भूमिका बजावली, तर बँकांना त्यांच्या कामकाजाचे सहज व्यवस्थापन करता येऊ शकेल, अशा प्रकारे काही रचना करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यामुळे त्यांना बाजारातून भांडवल

उपलब्ध होऊ शकेल आणि पर्यायाने त्यांच्या आर्थिक ताळेबंदात सुधारणा होऊ शकेल याकडेही वित्त सेवा सचिवांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय बँकांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून विविध लहान सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव देणारे अनेक अहवाल येऊनही त्याबाबत कोणताही मार्ग निघालेला नाही. देशात २७ राष्ट्रीयीकृत बँका असून त्यामध्ये एसबीआयच्या पाच सहयोगी बँकांचा समावेश आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बँकांच्या अधिग्रहण आणि विलीनीकरणाचा संकेत दिले होते.