आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banking Sector News In Marathi, March End, Divya Marathi

मार्चअखेर तीन दिवस बॅँकांचे कामकाज सुरू राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक वर्षाच्या शेवटी कर संकलन करण्याच्या उद्देशाने 29, 30 आणि 31 मार्च या तिन्ही दिवशी बॅँकांच्या शाखा पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत.शनिवार 29 मार्च, रविवार 30 मार्च आणि 31 मार्च हा आर्थिक वर्षाच्या शेवटचा दिवस असून देशाच्या काही भागांत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे, परंतु महसूल संकलन योग्य रीतीने करता यावे यादृष्टीने या तिन्ही दिवशी बॅँकांचे कामकाज पूर्ण दिवस सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्या, अशी विनंती केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाने वित्त सेवा सचिवांकडे केली होती.

बहुतांश महसुलाची रक्कम महिनाअखेरीस गोळा होत असल्याचे स्पष्ट करतानाच बॅँकांनी कर भरणा-या व्यक्तींसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कर रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यंदा सादर करण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने विद्यमान आर्थिक वर्षासाठी अप्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य कमी केले आहे.