आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Banks Complusory Collecting Rupee For The SMS Alerat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँका एसएमएस अलर्टसाठी करतायत सक्तीची शुल्क वसुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांसह अनेक खासगी बँका एसएमएस अलर्टसाठी ग्राहकांकडून वर्षाला सक्तीची शुल्क वसुली करू लागल्या आहेत. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँका असे शुल्क वसूल करत असल्याची माहिती शुक्रवारी संसदेत दिली.


एसएमएस अलर्टसाठी स्टेट बँक 60 रुपये तर कॅनरा बँक वर्षाला 100 रुपये शुल्क वसूल करू लागली आहे. आयडीबीआय आणि विजया बँक 2010-11 पासूनच एसएमएस अलर्टसाठी ग्राहकांकडून शुल्क वसुली करू लागल्या आहेत, परंतु बचत खात्यावरील एसएमएस अलर्टसाठी दोन्ही बँका शुल्क घेत नाहीत. चेक बाऊन्स, वेतन जमा होणे किंवा बॅलन्स कमी झाल्याची माहिती देण्यासाठीच वर्षाला 60 रुपये शुल्क वसूल करतो. ही सेवा घ्यायची की नाही, हे ग्राहकांवर अवलंबून असल्याचे एचडीएफसी बँकेचे म्हणणे आहे. मोबाइल सेवा प्रदात्यांनी बल्क एसएमएसचा दर दोन पैसे प्रतिएसएमएसवरून वाढवून 20 पैसे प्रतिएसएमएस केल्यामुळे ही सेवा मोफत देणे अशक्य झाले आहे, असे एका खासगी बँकेच्या अधिका-यांनी सांगितले.


ग्राहक अंधारातच : शुल्क आकारणीचा एसएमएस आम्ही ग्राहकांना पाठवला होता. मात्र, बहुतांश ग्राहकांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे ती त्यांची सहमती समजून त्यांना सेवा सुरू करण्यात आली असल्याचा बहुतांश बँकांचा युक्तिवाद आहे.