आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज स्वस्त करण्यासाठी बँकांनी पावले उचलावीत - पी. चिदंबरम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - आर्थिक विकासाचा दर वाढवण्यासाठी स्वस्त कर्ज महत्त्वाचे आहे. यासाठी बँकांनी व्याजदर कमी करण्यासाठी आपल्या कार्यचलनाचा खर्च कमी करून त्याचा लाभ थेट ग्राहकांना दिला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. शनिवारी 21 राज्यांत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) 101 शाखांचे उद्घाटन बँकेच्या मुख्यालयातून करण्यात आले. आता देशभरात एसबीआयच्या 14,598 शाखा झाल्या आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांना संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक या नात्याने एसबीआयने देशातील सर्व नागरिकांना चांगल्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. तंत्रज्ञान आणि आर्थिक बाबतीत या बँकेने महत्त्वाची भूमिका बजावावी. तत्पूर्वी बँकेचे चेअरमन प्रतीप चौधरी म्हणाले, सरकारच्या निर्देशांनुसारच एसबीआय दुर्गम ग्रामीण भागांत शाखा उघडत आहे. गृह तसेच कार लोनचे व्याजदर कमी करून बँकेने छोट्या कर्जदारांना चांगला दिलासा दिला असल्याचेही ते म्हणाले.