आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banks Taking Fees For The SMS From Account Holders

सर्वसामन्यांच्या खिशावर वार, बँकांचा ‘एसएमएस’ला शुल्कभार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डेबिट कार्डच्या वापराबाबत वर्षाकाठी ग्राहकांच्या खात्यातून ठरावीक रक्कम कापून घेणा-या बँकांची नजर आता एसएमएसवर पडली आहे. बँकेकडून पाठवण्यात येणा-या एसएमएसवर शुल्क आकारण्याचा काही बँकांचा विचार आहे. अ‍ॅक्सिस व आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकांनी तर एसएमएसवर शुल्क आकारण्यास सुरुवातही केली आहे. विविध प्रकारच्या सुविधांपोटी शुल्क देऊन फाटलेल्या ग्राहकांच्या खिशावर हा नवा भार पडला आहे.


ग्राहकांनी केलेल्या विविध बँक व्यवहारांची माहिती एसएमएसद्वारे संबंधित ग्राहकांना कळवण्यात येते. आता या एसएमएसवर शुल्क आकारण्यात येणार आहे. थोडक्यात, मोबाइल बँकिंग सुविधेवर हे शुल्क आहे. खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस आणि आयसीआयसीआय बँकांनी एसएमएससाठी प्रत्येक ग्राहकाकडून वर्षाकाठी 60 रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वप्रथम एचडीएफसी बँकेने असे शुल्क वसूल करण्यास प्रारंभ केला. यंदाच्या एप्रिलपासूनच हा नवा भार ग्राहकांवर पडला आहे. आयसीआयसीआय बँकेने गेल्या महिन्यात एसएमएसवर तिमाही आधारावर 15 रुपये शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे.अ‍ॅक्सिस बँकेने 15 जूनपासून ही शुल्क वसुली सुरू केली आहे. बँकेने सर्व खातेधारकांवर एसएमएस बँकिंगसाठी महिन्याकाठी 5 रुपये शुल्क लावले आहे.


सार्वजनिक बँका तयारीत
खासगी बँकांनी एसएमएसवर शुल्क आकारणीस सुरुवात केल्याने सार्वजनिक बँकांतही याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया या बँकाही आगामी काळात असे शुल्क लावू शकतात.


शुल्क वसुलीत आघाडी
बचत खात्यावर ग्राहकांना 7 टक्के व्याज देणा-या येस बँक आणि कोटक बँक शुल्क आकारणीत आघाडीवर आहेत. येस बँक तर या सेवेपोटी ग्राहकाला महिन्याकाठी 10 रुपये आकारते. कोटक बँक पूर्वी या सेवेपोटी वर्षाला 200 रुपये वसूल करायची. आता हे दर घटवून 120 रुपये केले आहेत. साप्ताहिक आधारावर असलेल्या एसएमएस सेवेसाठी शुल्क 75 रुपयांवरून 60 रुपये करण्यात आले आहे.